‘ते’ वक्तव्य पडलं महागात! शरद पवारांच्या निकटवर्तीय नेत्याविरोधात तक्रार
‘ते’ वक्तव्य पडलं महागात! शरद पवारांच्या निकटवर्तीय नेत्याविरोधात तक्रार
img
Nandini khandare More
राजकरणात सध्या मोठं मोठ्या घडामोडींना वेग आला असून राज्यात सध्या पेपरफुटी प्रकरणावरून मोठे गदारोळ सुरु असून आता शरद पवार यांच्या गटातून एक मोठी  बातमी समोर येत आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मेहबूब शेख यांच्याविरोधात औसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात भाजपचे आमदार अभिमन्यू पवारांचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी भाजप आमदार अभिमन्यू पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या कार्यकर्त्याने औसा पोलिसात मेहबूब शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. एमपीएससी पेपर फुटीतील आरोपींसोबत आमदार अभिमन्यू पवारांचे थेट सबंध असल्याचा आरोप महबूब शेख यांनी केला होता.

मात्र एमपीएससी पेपर फुटीप्रकरणात आमदार अभिमन्यू पवार यांचा कुठलाही थेट सबंध नसल्याचे सांगत ही केवळ अभिमन्यू पवारांची बदनामी केली जात असल्याचे सांगत मेहबूब शेख यांच्याविरोधात औसा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चा होऊ लागली आहे. आता पोलिस या प्रकरणी मेहबूब शेख यांच्याविरोधात काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे राहिल.

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये ६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता राजकीय कनेक्शन असल्याचे समोर येत आहे. याबाबत शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आवाज उठवला आहे. एमपीएससीचा पेपर फुटलेला आहे मात्र एमपीएससीने हे सगळं नाकारलं होतं. यावर मेहबूब शेख यांनी माध्यमांशी संवाद साधला होता.

यावेळी बोलताना मेहबूब शेख यांनी सांगितले होते की, 'आता दूध का दूध पाणी का पाणी झालं. एमपीएससी हे नाकारणारच. कारण याची पाळंमुळं एमपीएससीमध्ये आहेत. पेपरफुटीचा जो मेन डिस्ट्रीबुटर आहे हा एमपीएससीत बसलेला आहे. आता जी अटक झाली ती दलालाला आणि ग्राहकांना अटक झाली. पण मेन म्होरक्या आहे याचा मास्टर माइंड हा एमपीएससीमध्ये नागासारखा ठाण मांडून बसला आहे.'
इतर बातम्या
Join Whatsapp Group