सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन प्रकरणाने मोठी खळबळ निर्माण झाली असून या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियन हिच्या मृत्यूबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिलेले.
अशातच आता न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयनं याप्रकरणी एफआयआर दाखल केलाय. तसेच, उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरेंच्या चौकशीची सीबीआय मागणी करणार आहे. याव्यतिरिक्त दिनो मारिया, रिया चक्रवर्तीच्या चौकशीचीही सीबीआय मागणी करणार आहे. दरम्यान, CBI कडून एफआयआरची कॉपी हायकोर्टाला दिली जाणार आहे.
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या मुलीच्या मृत्यूची नव्यानं चौकशी करण्याची आणि सीबीआयद्वारे तपास करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हायकोर्टानं दिलासा देत, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे आदेश, सीबीआयला दिलेले. आता या प्रकरणी तीन पानांचा एफआयआर आणि सात पानांचा जबाब सादर करण्यात आला आहे.