राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2027 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आता त्यांच्या अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.
राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार ,बारावीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत होणार असल्याची माहिती आहे. सविस्तर वेळापत्रक नंतर जाहीर होणार असून या तारखांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी व्यवस्थित नियोजन करता येणार आहे.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. इयत्ता बारावीच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) आणि दहावीच्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले आहे.
बारावीचे वेळापत्रक
प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: बुधवार, 20 जानेवारी 2027 ते शनिवार 6 फेब्रुवारी 2027
लेखी परीक्षा: सोमवार, 8 फेब्रुवारी ते मंगळवार 16 मार्च 2027
दहावीचे वेळापत्रक
प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा: गुरुवार, 28 जानेवारी ते शनिवार, 13 फेब्रुवारी 2027
लेखी परीक्षा: सोमवार, 15 फेब्रुवारी ते गुरुवार, 11 मार्च 2027
बोर्डाने परीक्षांच्या तारखा वेळेत जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच अभ्यासाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.
लेखी परीक्षांपूर्वी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा बुधवार, 20 जानेवारी ते शनिवार, 6 फेब्रुवारी 2027 या कालावधीत होणार आहेत. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा गुरुवार, 28 जानेवारी ते शनिवार, 13 फेब्रुवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक संबंधित विभागीय मंडळांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत वेळापत्रक तपासून त्यानुसार परीक्षेची तयारी करावी, असे आवाहन मंडळाने केले आहे.