शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नव्या महिला अध्यक्षाची निवड करणार; ''या'' नावावर शिक्कामोर्तब
शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नव्या महिला अध्यक्षाची निवड करणार; ''या'' नावावर शिक्कामोर्तब
img
Nandini khandare More

राजकारणातील घडामोडींना वेग आला असून आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून एक बातमी समोर येत आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेतृत्वात मोठा फेरबदल पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष पद विदर्भाकडे जाणार आहे. नागपूर विभागातून महिला अध्यक्ष निवडला जाणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. 

खानदेशमधून रोहिणी खडसे यांनी महिला अध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षात सरस कामगिरी केली आहे. त्यांना या पदावर तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर आता त्यांच्या जागी नवीन महिला अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार आहे.

आता  शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष पदी डॉ. अंजली साळवे यांची लवकरच नियुक्ती होणार आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हस्ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. रोहिणी खडसे यांनी 3 वर्ष कालावधी पूर्ण केल्यानंतर आता साळवे यांचाकडे जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. खडसे यांना आता कोणती जबाबदारी देण्यात येते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group