भाजपला मोठा फटका : शरद पवारांच्या उपस्थितीत आज
भाजपला मोठा फटका : शरद पवारांच्या उपस्थितीत आज "या" नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
img
DB
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा आज   सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक गैबी चौकात  मेळावा होत आहे.यावेळी पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार असून, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

यावेळी समरजितसिंह घाटगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यकर्त्यांसह प्रवेश होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. खासदार पवार यांच्या स्वागतासाठी कागलनगरी सज्ज झाली आहे.

मेळाव्यास राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पवार, महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी माने, महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कागल तालुकाध्यक्षा अश्विनी व्हरांबळे, प्रवीणसिंह घाटगे आदी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची कागलमध्ये ही पहिलीच सभा होत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group