धक्कादायक ! जयंत पाटील यांच्या स्वर्गीय वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोणा, राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्या, लिंबू फिरवलं अन...
धक्कादायक ! जयंत पाटील यांच्या स्वर्गीय वडिलांच्या प्रतिमेवर जादूटोणा, राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या टोचल्या, लिंबू फिरवलं अन...
img
वैष्णवी सांगळे
सांगलीत निवडणुकांच्या धामधुमीत राष्ट्रवादीचे नेते, आमदार जयंत पाटील यांचे वडील स्व. राजाराम बापू पाटील यांच्या प्रतिमेवर जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकाराविरोधात राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी आक्रमक झाले असून संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. 

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत सांगलीमध्ये जादूटोण्याचा प्रकार उघडकीस आल्यानं या घटनेची आता उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.  पुरोगामी जिल्हा अशी राज्यात सांगलीची ओळख आहे, मात्र तरी देखील अशा घटना घडत असल्यानं आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.  वाळवा तालुक्यातील येल्लूर येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. 

रोहित पवार यांचे ट्विट :
सांगलीमध्ये (येलूर, ता. वाळवा) लोकनेते स्व. राजाराम बापू पाटील यांचा फोटो असलेल्या पोस्टरला काळा रंग फासून, टाचण्या टोचून आणि त्यावर लिंबू, केळी असा उतारा करुन हा फोटो रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याचा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात असा प्रकार होत असेल आणि एका दिवंगत लोकनेत्याच्या फोटोची अशा प्रकारे विटंबना केली जात असेल तर हे संतापजनक आणि चीड आणणारं आहे. हे करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी, ही विनंती!

दरम्यान नेमकं हा प्रकार कोणी केला, त्यामागे त्याचा उद्देश काय होता? याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाहीये. मात्र या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group