राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जयंत पाटील काय शरद पवार हे देखील भाजपच्या संपर्कात आहे. मविआतील सगळे आमच्या संपर्कात आहे, या गोष्टी उघडपणे बोलायच्या नसतात. मात्र ते आधीपासूनच आमच्या संपर्कात आहे. विधानसभा निवडणुकीत आणखी लोकं संपर्कात येतील आणि सर्व चित्र स्पष्ट होईल, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
राज्याच्या महिलांसाठी महत्वाकांशी ठरलेल्या लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक आधी म्हणाले होते की, पैसे नाही तर ही फक्त घोषणा आहे. मात्र आता या योजनेला भरघोष प्रतिसाद मिळत असल्याने त्याला कॉन्टॅर करण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न केला जात आहे.
बदलापूर येथे झालेल्या घटनेनंतर तेथील नागरिकांनी रोष व्यक्त केलाय. याची तीव्रता राज्य आणि देशभर पाहायला मिळाली आहे. या घटनेचा बोध सर्वांनी घेतला आहे. यात राजकारण केलं गेलं नाही पाहिजे, पण काही लोक यात राजकारण करत आहेत.
गृहमंत्री यांचा राजीनामा मागत आहेत. अशावेळी सरकारमध्ये कोण यापेक्षा एकत्र येऊन याचा धडा घेतला पाहिजे, मात्र काही जण केवळ मोर्चे काढत आहे. बदलापूरच्या स्थानकावर उभे असलेल्या लोकांचं राजकारण केले जात आहे. परिणामी काल लाठीचार्ज करावा लागला. त्यामागील कारण म्हणजे दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होत होती. आज राज्यात 95 टक्के कॉलेज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आहेत. तिथे रॅगिंग होत नाही का? काही लोक मोर्चे काढत असून, लाडकी बहीण योजनेला कॉन्टॅर करण्यासाठी या घटनेचं भांडवल केले जात असल्याचा आरोपही संजय शिरसाट यांनी यावेळी केला आहे.