८१ हजार कोटींच्या ठेवीपैकी ३६ हजार कोटींच्या ठेवी मुंबई महापालिका मोडणार, ठाकरेंचा तो प्रचार अन...
८१ हजार कोटींच्या ठेवीपैकी ३६ हजार कोटींच्या ठेवी मुंबई महापालिका मोडणार, ठाकरेंचा तो प्रचार अन...
img
वैष्णवी सांगळे
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. मुंबई महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्या एकूण ठेवी ८१ हजार ४४९ कोटी ३२ लाख रुपये शिल्लक आहेत. त्यापैकी ४४ हजार ८२६ कोटी 23 लाख रुपये बांधील दैतवापोटी राखीव असल्यामुळे पालिकेला तोडता येणार नाहीत. 

मात्र उर्वरित ३६ हजार ६२३ कोटी ०९ लाख रुपये पालिका वेगवेगळ्या प्रकल्पासाठी वापरणार असल्याचं अर्थसंकल्पात स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेतील ठेवी आता सत्ताबदलानंतर मोडल्या जातील असा प्रचार ठाकरे सेनेकडून केला होता. तसंच चित्र आता पाहायला मिळत आहे.

मुंबईत जवळपास एकूण 101 पुलाची कामे हाती घेण्यात आली आहेत. यापैकी 24 कामं पूर्ण झाली असून मार्च 2026 पर्यत 23 कामे पूर्ण होणार आहेत. 2026-27 मध्ये 31 कामे पूर्ण करण्यात येतील. 2028-29 मध्ये 23 पुलांची कामे मुंबई महानगर पालिका पूर्ण करणार आहे. नवीन पूल बांधणीसाठी पूल खात्यासाठी एकूण 9 हजार 650 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये कोस्टल रोडच्या 6 व्या टप्याचा समावेश आहे. 

वर्सोवा दहिसरच्या कोस्टल रोडसाठी एकूण 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गोरेगाव मुलुंड लिंक रोड 2 हजार 650 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मुंबईतील विविध महानगर पालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी 1 हजार 62 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. 
BJP | BMC |
इतर बातम्या
Join Whatsapp Group