"या" ठिकाणी अज्ञातांनी भाजपचं कार्यालय फोडलं, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
img
Dipali Ghadwaje
निवडणुकीच्या पार्शवभूमीवर राज्यात तणावाचे वातावरण असताना डोंबिवलीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. डोंबिवली पश्चिमेत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. तीन ते चार अज्ञातांनी शिवीगाळ आणि मारहाण करत भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. 

गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. डोंबिवली विधानसभा मतदारसंघात कॅबिनेट मंत्री भाजपा महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात विधानसभेची थेट लढत होत आहे. डोंबिवली पश्चिमेत झालेल्या भाजप तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 

डोंबिवलीमध्ये गेल्या तीन टर्मपासून रविंद्र चव्हाण हे आमदार आहेत. 2009 पासून ते सातत्याने डोंबिवली मतदारसंघामधून विधानसभेची निवडणूक जिंकत आहेत. 

दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर डोंबिवली पश्चिमेत भाजप कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेवरून एकच खळबळ उडाली आहे. भाजपमधील सूत्रांनी या तोडफोडीचा आरोप विरोधकांवर केला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group