धक्कादायक खुलासा: लोकेशन बदलून पोलिसांना हुलकावणी देणारी निदा खान जेरबंद; UPT अहवाल 'पॉझिटिव्ह' आल्याने न्यायालयीन पेच वाढणार?
धक्कादायक खुलासा: लोकेशन बदलून पोलिसांना हुलकावणी देणारी निदा खान जेरबंद; UPT अहवाल 'पॉझिटिव्ह' आल्याने न्यायालयीन पेच वाढणार?
img
नितीशा कुलकर्णी










एका बाजूला बळजबरीने धर्मांतर केल्याचा गंभीर आरोप आणि दुसऱ्या बाजूला २५ दिवसांचा पोलिसांशी चाललेला लपाछपीचा खेळ... टीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान हिचा प्रवास अखेर पोलीस कोठडीपर्यंत पोहोचला आहे. मुंब्रा ते संभाजीनगर अशा पळापळीनंतर निदा पोलिसांच्या हाती लागली खरी, पण वैद्यकीय अहवालातील 'त्या' पॉझिटिव्ह रिपोर्टने नाशिकच्या या हायप्रोफाईल प्रकरणातील गुंतागुंत अधिकच वाढवली आहे.

नाशिक आणि राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या TCS प्रकरणातील फरार महिला आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या २५ दिवसांपासून पोलीस तिच्या मागावर होते. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतल्यानंतर आज नाशिक कोर्टात हजर करण्यात आले. नाशिकमधील बळजबरीचं धर्मांतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर निदा खान फरार झाली होती. तिने अटकपूर्व जामिनासाठी अर्जदेखील केला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावला. याच दरम्यान ती गरोदर असल्याची माहिती समोर आली होती. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे.

नाशिकमधील टीसीएस कंपनीत बळजबरीने धर्मांतर करण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील काही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तपासात आणि चौकशीत निदा खान या महिला कर्मचाऱ्याचे नाव समोर आले. पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली. मात्र, निदा खान फरार होती. याच दरम्यान ती गरोदर असल्याची माहिती समोर आली होती. त्यासाठी तिने मुंब्रामधील डॉक्टरांशी उपचाराबाबत मदत घेतल्याचे समोर आले होते.

दाखान खरंच गरोदर?
गेल्या २५ दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला पोलिसांनी गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली. मात्र, अटकेनंतर निदा खानची जी प्राथमिक वैद्यकीय तपासणी (Medical Check-up) करण्यात आली, त्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निदा खान ही दोन महिन्यांची गरोदर आहे.

UPT अहवाल पॉझिटिव्ह
अटकेनंतर निदा खानला पोलीस कोठडीत घेण्यापूर्वी तिची आरोग्य तपासणी करणे अनिवार्य होते. यावेळी करण्यात आलेल्या UPT (Urinary Pregnancy Test) चा अहवाल 'पॉझिटिव्ह' आला आहे. निदा खान दोन महिन्यांची गरोदर असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून, यामुळे आता या प्रकरणाला आणि न्यायालयीन प्रक्रियेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

निदा बदलायची वारंवार लोकेशन
दरम्यान, निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये लपून बसली होती. धक्कादायक बाब म्हणजे, ती एकटी नसून तिचे चार नातेवाईकही त्याच फ्लॅटमध्ये तिच्यासोबत राहत होते. निदा वारंवार आपले लोकेशन बदलत असल्याने पोलिसांना तिला पकडण्यात अडचणी येत होत्या. मात्र, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी रात्री 11:30 च्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून तिला ताब्यात घेण्यात आलं.

इतर बातम्या
Join Whatsapp Group