धक्कादायक ! पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागत दिली धमकी, या हायवेवर घडल प्रकार !
धक्कादायक ! पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; खंडणी मागत दिली धमकी, या हायवेवर घडल प्रकार !
img
Nandini khandare More
आजकाल खंडणी मागणे दमदाटी करणे फसवेगिरी असे प्रकार सर्रासपणे घडत आहेत.पण हाच प्रकार जर स्वतः पोलिसांकडून झाला तर ही अतिशय गंभीर प्रकार आहे. ते म्हणजे असं की ''कुंपणच शेत खातय'' असाच प्रकार आता लोणावळा येथून समोर आला आहे. 

पुणे-लोणावळा महामार्गावर पर्यटकांना लुटणाऱ्या पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारमधून लोणावळ्याला फिरण्यासाठी निघालेल्या दोन तरुणांसह दुबईहून आलेल्या एका दाम्पत्याला अडवून गाडीत ड्रग्ज असल्याचे खोटे सांगत ६ पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचे अपहरण केले. तसेच ५ लाख रुपयांची खंडणी मागून त्यांना तब्बल ७ तास ओलीस ठेवल्याचेही समोर आले. याप्रकरणी विमाननगर पीडित व्यक्तीने कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर ६ पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एआयएमआयएमचे माजी इम्तियाज जलील यांनी यासंदर्भातील माहिती दिली. फिर्यादी हे पुणे येथील एका इन्शुरन्स कंपनीत अ‍ॅनालिस्ट म्हणून काम करतात. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांचे मित्र मोहम्मद काशान आझमी (२८), त्यांची पत्नी आणि मेव्हणे सय्यद जुबेर अहमद हे काही दिवसांपूर्वीच दुबईहून पुण्यात फिरण्यासाठी आले होते. ६ जुलै २०२६ रोजी हे चौघे जण कारमधून रात्री ८:३० च्या सुमारास लोणावळ्यातील प्रसिद्ध मॅप्रो गार्डन येथे फिरण्यासाठी निघाले होते.

कार कामशेत परिसराजवळ पोहोचली असता, एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून आलेल्या ६ अज्ञात पोलिसांनी प्रवाशांची गाडी अडवली. "आम्ही पोलीस आहोत, तुमच्या गाडीची झडती घ्यायची आहे," असा बहाणा त्यांनी केला. गाडीत काहीही संशयास्पद नसताना त्यांनी तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांना धमकावण्यास सुरुवात केली. तुमच्या गाडीत गांजा किंवा ड्रग्ज आहे, ते काढून द्या. नाहीतर तुमच्यावर मोठी कारवाई करू, अशी धमकी त्यांनी दिली. यादरम्यान आरोपी पोलिसांना कारमध्ये अँबर लीफ कंपनीचे एक सिगारेटचे पाकीट सापडले. याच पाकिटावरुन धमकावत, पोलीस कारवाई नको असेल तर ५ लाख रुपये द्यावे लागतील, अशी थेट खंडणीची मागणी या पोलिसांनी केली.

७ तास ओलीस ठेवून फिरवले; 

एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न त्या पोलिसांनी कारमधील सर्वांचे मोबाईल काढून घेत कोणाशीही संपर्क साधू दिला गेला नाही. त्या पोलिसांनी चौघांना त्यांच्याच कारमध्ये डांबून ठेवले आणि रात्रीपासून पहाटेपर्यंत तब्बल ७ तास त्यांना ओलीस ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी फिरवले. शेवटी, ५ लाख रुपये वसूल करण्यासाठी हे पोलीस पर्यटकांना तळेगाव येथील एका एटीएम सेंटरवर घेऊन गेले. 'स्मार्ट वॉच' ठरले देवदूत; पोलीस आयुक्तांनी केली सुटका मोबाईल हिसकावले असले तरी एका तरुणाच्या हातातील स्मार्ट वॉचकडे आरोपी पोलिसांचे लक्ष गेले नाही. याचाच फायदा घेत, एका तरुणाने गुपचूप आपल्या स्मार्ट वॉचवरून पुण्यात राहणाऱ्या एका मित्राला इमर्जन्सी हेल्पचा मेसेज पाठवला. त्या मित्राने तातडीने पिंपरी-चिंचवड पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि त्यांचे तीन उपायुक्त तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. पिंपरी पोलिसांची पथके तळेगावच्या दिशेने रवाना झाली. 

आपण पोलिसांच्या जाळ्यात अडकणार आणि पर्यटक इतर पोलिसांशी संपर्क साधत असल्याचे लक्षात येताच, कारमध्ये बसलेले दोन आरोपी पोलीस तातडीने उतरले आणि आपल्या कारमधून पसार झाले. आता काय कारवाई होणार? सुरुवातीला पिंपरी पोलिसांना हे कृत्य एखाद्या सराईत टोळीचे असावे असा संशय होता, मात्र तपासानंतर हे अपहरणकर्ते पुणे ग्रामीण पोलीस दलातीलच कर्मचारी असल्याचे समोर आले. या धक्कादायक प्रकारामुळे पुणे पोलीस वर्तुळात तीव्र संताप आणि खळबळ व्यक्त होत आहे. त्यामुळे आता पोलिसांवर काय कडक कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group