पावसाचा तडाखा सुरूच; रुग्णालयातून एकनाथ शिंदेंचे नागरिकांना आवाहन
पावसाचा तडाखा सुरूच; रुग्णालयातून एकनाथ शिंदेंचे नागरिकांना आवाहन
img
Nandini khandare More

 सध्या राज्याच्या राजकरणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून काल अचानक एकनाथ शिंदे यांनी प्रकृती खराब झाली. ठाण्यात मोठे पक्षप्रवेश होते. मात्र, प्रकृती खराब झाल्याने तिथे एकनाथ शिंदे पोहोचू शकले नाही. शुभांगी पाटील यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. प्रकृती बरी नसल्याने आणि अस्वस्थ वाटत असल्याने एकनाथ शिंदे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल असले तरीही ते आपल्या कर्तव्य पार पाडत आहेत. एकनाथ शिंदे थेट रुग्णालयातून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून पावसाच्या अडचणीबाबतही माहिती मागवली आहे. नागरिकांना तातडीने मदतकार्य राबवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

रुग्णालयातून राज्यातील अतिमुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. प्रशासकीय अधिकारी तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना देखील दिल्या आहेत.

इतर बातम्या
Join Whatsapp Group