नाशिक : नाशिक शहरामधील नाशिक शहर २ विभाग मधील द्वारका कक्ष २ अंतर्गत १३२ केव्ही टाकळी उपकेंद्र येथे महत्त्वाच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी शनिवारी ४ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. परिसरातील उत्तरा नगर, शंकर नगर, काठे गल्ली, बोधले नगर पखाल रोड, सारडा सर्कल परिसर, तपोवन रोड, टाकळी रोड, टाकळी गाव, भाभा नगर, वडाळा नाका, अशोका मार्ग, रविशंकर मार्ग, टाकळी औद्योगिक वसाहत, रॉयल कॉलनी, सह्याद्री सिग्नल परिसर, जनरल वैद्य नगर व परिसर यांचा समावेश आहे.
देखभाल व दुरुस्तीचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्यात येईल. तरी संबंधित ग्राहकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ यांच्याकडून करण्यात आले आहे.