सध्या राज्यात पावसाने धुमाकूळ घातलेला असून नाशिकला अलर्ट जारी केला असून आज नाशिक जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा दिला आहे.दरम्यान, या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासन सतर्क झाले आहे.
प्रशासनाकडून रामकुंड परिसरातील टपऱ्या आणि लहान दुकाने हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गोदावरी नदीची पाणीपातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात येत आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक नसल्यास नदीकाठच्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.