केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने मोठी खळबळ निर्माण झाली असून आता या प्रकरणात नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान या प्रकरणचे धागे दोरे किती लंबर पसरलेले आहेत याचाच शोध सध्या पोलीस घेत आहेत. दरम्यान आता या प्रकरणात एक मोठं ट्विस्ट आला आहे.
केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरीचीपोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळं आज या दोघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीचनंतर हजर केलं जाईल. या सुनावणी आधी आतापर्यंतची सगळ्यात मोठी माहिती समोर आली आहे. केतन अग्रवालचा खूनाचा कट आणखी एका तरुणाला माहिती होता. या तरुणाला पोलिसांनी आता ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, सदर प्रकार आणखी कोणाला तरी माहिती असावा, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांचा तोच संशय आता खरा ठरल्याचं दिसून येत आहे.
केतन अग्रवालच्या खूनाचा कट आणखी एका तरुणाला माहिती होता. हा तरुण चेतन चौधरी याचा वर्गमित्र आहे. केतन अग्रवाल खून प्रकरणात आणखी एका तरुणाचे नाव समोर येते आहे. हा तरुण चेतन चौधरी याचा वर्ग मित्र आहे. केतनच्या खूनाचे प्लॅनिंग चेतन आणि सिया या दोघांनी त्याच्यासोबत डिस्कस केले होते. त्या तरुणाला लोहगडावर चालण्याचा देखील आग्रह या दोघांनी केला होता. मात्र तो तरुण 18 जून रोजी लोहगडावर गेला नाही. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केतन अग्रवाल याचा खून केल्यानंतर चेतन पहिल्यांदा याच त्याच्या मित्राला भेटला आहे. सिया देखील या तरुणासोबत बोलली असल्याची माहिती आहे.
सदर तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून सध्या तो बालेवाडी येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनाच्या संपर्कात होता. पुणे ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतला असून त्याच्याकडे अधिक चौकशी सुरू आहे. दरम्यान या तरुणाने केतन याचा खून करू नका, असे देखील चेतन आणि सिया या दोघांना सांगितल्याची माहिती आहे.
आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत कसून तपास करण्यात आला, यात पोलिसांच्या हाती लागलेले महत्वाचे धागेदोरे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे. नसरापूर येथील भीमराव कांबळे प्रकरणामध्ये पोलिसांनी न्यायालयात 'लास्ट सीन टुगेदर' ही थिअरी मांडली होती. त्यानूसार या लोहगडावरील घटनेमध्ये देखील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक तपासानुसार पोलिस 'लास्ट सीन टुगेदर' ही थिअरी न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती समोर येत आहे.