महत्वाची बातमी ! ''या'' ठिकाणी ''हे'' 6 दिवस मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना बंदी ; पोलिसांकडून कडक सूचना
महत्वाची बातमी ! ''या'' ठिकाणी ''हे'' 6 दिवस मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यांना बंदी ; पोलिसांकडून कडक सूचना
img
Nandini khandare More

 संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त आळंदीत लाखो वारकऱ्यांची प्रचंड गर्दी होणार आहे. भाविकांची सुरक्षा आणि शहरातील सुव्यवस्था राखण्यासाठी आळंदी पोलीस ठाण्यात एक तातडीची आणि महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.आळंदी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव ६ दिवसांच्या कालावधीत सर्व मंगल कार्यालयांमधील विवाह सोहळ्यांना पूर्णपणे बंदी घातली आहे.

काय सुरू आणि काय बंद?
लग्नकार्यांवर बंदी: ४ ते ९ जुलै या काळात आळंदीतील कोणत्याही मंगल कार्यालयात किंवा धर्मशाळेत विवाह, साखरपुडा किंवा मोठे कौटुंबिक कार्यक्रम करता येणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके यांनी दिले आहेत.बांधकामे रोखली: पालखी सोहळ्याच्या काळात शहरातील सर्व नवीन बांधकामे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धोकादायक इमारतींवर वॉच: जुन्या आणि धोकादायक इमारती असलेल्या धर्मशाळांमध्ये दिंड्यांचा मुक्काम पूर्णपणे टाळण्यास सांगण्यात आले आहे.
ज्यांचे विवाह सोहळे आधीच ठरले आहेत, त्यांनी तारखा आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्यावा, असे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी नमूद केले आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group