मे महिन्यात ही घटना घडली होती. संपूर्ण महाराष्ट्राला या प्रकरणाने हादरवून सोडलं होतं. आरोपी भीमराव कांबळेने साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची निर्घृण पद्धतीने हत्या केली होती. दरम्यान , नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावण्यात येणार आहे. सगळ्या राज्याचं लक्ष या खटल्याच्या निकालाकडे लागलं आहे.
“नसरापूर प्रकरणात आज कोर्टाकडून शिक्षा सुनावली जाईल. हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानून कोर्टाने आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी” अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. “कोर्टात आज युक्तीवाद होणार नाही. आरोपीला हजर करुन शिक्षेची सुनावणी होईल अशी माहिती सरकारी वकिलांनी दिली. आरोपीचा मागचा इतिहास बघता तो सुधारु शकत नाही. कोर्टाने हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण मानून आरोपी मृत्यूदंड द्यावा” अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.
दरम्यान , सरकारने फास्ट ट्रॅकवर या खटल्याची सुनावणी केली. पोलिसांनी याप्रकरणी बाराशे पानांची चार्जशीट तयार केली होती. आरोपीला मृत्युदंड किंवा जन्मठेप अशी शिक्षा दिली जाऊ शकते.