प्रशिक्षण देण्याचे सांगून नाशिकच्या
प्रशिक्षण देण्याचे सांगून नाशिकच्या
img
दैनिक भ्रमर
नाशिक- आगामी सिंहस्थांचा काळ लक्षात घेऊन नोकरी लावून देणे तसेच आपत्तकालीन संरक्षण,सुरक्षिततेविषयी प्रशिक्षणाचे कारण पुढे करत नाशिकमधील काही नागरीक सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी भोंसला संस्थेच्या नावाने पैसे उकळत असल्याचे लक्षात आले आहे. संबंधीत व्यक्तीविरूध्द संस्थेने गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. अशाप्रकारे सीएचएमई,भोंसला संस्थेच्या नावाचा वापर करून असे पैसे उकळणाऱ्या व्यक्तीपासून नागरीकांनी सावध रहावे, कुठलाही व्यवहार करू नये, असे आवाहन सीएचएमई,भोंसला संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

  याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतील माहिती अशी की, पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियमच्या मागे कार्यालय आहे. असे सांगत प्रीती विजय चव्हाण यांनी एसपी लेबर कॉन्टॅक्टर या फर्मच्या माध्यमातून आगामी सिंहस्थ काळ लक्षात घेऊन सफाई कामगार,नर्स,आया,वॉर्डबॉय,डॉक्टर,जलपटू,अग्नीशामक दल,पार्किंग,सिक्युरिटी,ट्राफीक पोलिस मदत,आचारी, जीवरक्षक अशा पदांसाठीची एक जाहीरात प्रतिमा(इमेज) तयार केली आहे. यापैकी अग्नीवीर पदांचे प्रशिक्षण हे संस्थेच्या भोंसला मिलिटरी स्कूल या युनिटमध्ये दिले जाणार असल्याचे नमूद केले आहे. अशापध्दतीने संस्थेचे नाव व प्रतिष्ठेचा गैरवापर करणे चुकीचे आहे.

व्यक्तीच्या कृतीतून धक्कादायक बाबीं उघड
संबंधीत व्यक्तीकडून संस्थेच्या नावाचा अनाधिकृत वापर करण्यात येत आहे. तसेच प्रशिक्षण कार्यक्रमांच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा केले जात आहेत,वास्तविक संबंधीत व्यक्तीला संस्थेकडून कोणतीही परवानगी किंवा अधिकार देण्यात आलेला नाही. या कृत्यामुळे नागरीकांची फसवणूक होण्याची शक्यता असून संस्थेची प्रतिष्ठा सुध्दा धोक्यात आली आहे.

नाशिककरांनी सावधानता बाळगावी
संबंधीत व्यक्तीने तयार केलेल्या जाहीरात प्रतिमेतील(इमेज) मोबाईलवर संपर्क केला असता प्रीती विजय चव्हाण या नावाने व्यक्ती बोलत होती व तिने अग्निवीर कोर्सेची फॉर्म फी रक्कम २०६० आहे असे सांगितले तसेच त्यांनी स्वतःच्या कार्यालयाचा पत्ता मीनाताई ठाकरे स्टेडीयच्या मागे असल्याचे सांगितले. बोलतांना संबंधीत व्यक्ती आमच्या संस्थेचे नाव वापरत अशी सूचना देत होती कि कोर्सेचे प्रशिक्षण हे भोंसला मिलिटरी स्कूलमध्ये असेल तेथे राहण्याची,खाण्याची व्यवस्था सुध्दा केली जाईल. त्याचबरोबर संबंधीत व्यक्तीं सांगते की आपण फीपोटी जे पैसे द्याल त्याची पावती मिळणार नाही कारण ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून त्याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. नाशिककरांना असे फोन आल्यास याबाबत सावधानता बाळगावी. असे आवाहन संस्थेने केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधीत व्यक्तीविरूध्द भारतीय कायद्यांनुसार कायदेशीर कारवाई करावी तसेच संस्थेच्या नावाचा होणारा गैरवापर तात्काळ थांबविण्यासाठी उपाययोजना कराव्यात,अशीही मागणी अर्जात केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group