नसरापूर अत्याचार प्रकरणी ''या'' तारखेला लागणार निकाल !
नसरापूर अत्याचार प्रकरणी ''या'' तारखेला लागणार निकाल !
img
Nandini khandare More
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या नसरापूर येथील तीन वर्षांच्या चिमुरडीवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणात  ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधातील आरोप सिद्ध झाल्याचे न्यायालयाने नमूद केले असून, या प्रकरणातील शिक्षेबाबतचा अंतिम निकाल २९ जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे.त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर पुणे जिल्ह्यासह राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. 4 वर्षांच्या बालिकेसोबत घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. आरोपीला जामीन देऊ नये आणि कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी महिला संघटना, नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करत अवघ्या 14 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. तब्बल 1200 पानांची चार्जशीट तयार करण्यात आली होती. तपासातील पुरावे आणि साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचं स्पष्ट केलं. आता 29 जून रोजी शिक्षेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

इतर बातम्या
Join Whatsapp Group