मोठी बातमी ! मंत्री उदय सामंत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंना घेऊन मुंबईकडे रवाना
मोठी बातमी ! मंत्री उदय सामंत नवनिर्वाचित आमदार गोकुळ गितेंना घेऊन मुंबईकडे रवाना
img
Nandini khandare More

नाशिकच्या राजकरणात आज मोठी उलटफेर झाली असून नाशिक नाशिकमध्ये अनपेक्षित निकाल लागला असून शिवसेनेचे (शिंदे गट) अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव करत अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. याचदरम्यान आता एक मोठी बातमी समोर येत आहे. 

नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांना शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे ओझर विमानतळावरून घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत. गोकुळ गिते हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज  सांयकाळी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे शिवसेनेची विधान परिषदेतील ताकद आणखी वाढणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोकुळ गिते यांचे फोनवरून अभिनंदन केले. तसेच त्यांना तात्काळ मुंबईतील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेटीसाठी बोलावले. यानंतर मंत्री उदय सामंत आणि जळगावच्या पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील हे विशेष विमानाने नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल झाले. 

 दरम्यान, यानंतर गोकुळ गिते यांच्यासह त्यांचे बंधू गणेश गिते हे मंत्री उदय सामंत आणि आमदार किशोर पाटील यांच्यासह ओझर विमानतळावरून  विशेष विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सध्या गिते हे मुंबईच्या दिशेने प्रवासात असून काही वेळातच ते शिंदेंची भेट घेणार आहेत. या भेटीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांचा शिवसेनेत (शिंदे गट) अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group