नाशिकच्या राजकारणात मोठी उलटफेर झाली असून आता एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये गेम फिरला असून महायुतीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला आहे.नाशिकमध्ये मतदान केंद्राबाहेर गोकुळ गीते समर्थकांचा जल्लोष सुरु आहे. गोकुळ गीते यांना 389 मत मिळाली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात गीते कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु आहे. हमसे जो टकरायेगा वो मिटी मे मिल जायेगा अशा घोषणा गोकुळ गीते यांच्या समर्थकांकडून दिल्या जात आहेत. नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नरेंद्र दराडे अधिकृत उमेदवार होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 17 जागांवर महायुतीने एकत्र निवडणूक लढवली.
नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली होती. पण या जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का आहे. याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटलेले पहायला मिळू शकतात. महायुतीत बेबनाव वाढू शकतो. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना पहिल्या फेरीत मिळाली 357 मतं. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना 248 मतं मिळाली. मोजणी प्रक्रियेत 13 मतं अवैध ठरली. त्यामुळे विजयासाठी 303 चा कोटा ठरलेला. पहिल्या फेरीतच कोटा पूर्ण झाल्याने दुसरी फेरी होणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले स्पष्ट.