बॉलिवूडमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री संचिता उगलने स्वत:चे जीवन संपवले आहे. संचिताने राहत्या घरात शेवटचा श्वास घेतला आहे. ती 30 वर्षांची होती. पण संचिताने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणी तपास करत आहे. संचिताच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
टेलीचक्करच्या रिपोर्टनुसार, अभिनेत्री संचिता उगलेने कथितरित्या आत्महत्या केली आहे. मात्र, तिच्या मृत्यूबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मुंबईतील राहत्या घरात संचिताने स्वत:चे जीवन संपवल्यानंतर कुटुंबियांना धक्का बसला आहे. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहे.
टीव्ही व्यतिरिक्त संचिताने चित्रपट आणि स्ट्रीमिंग प्रकल्पांमध्येही काम केले. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा ऐतिहासिक सिनेमा ‘छावा’ मध्ये देखील तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती. ती ताराराणीच्या तरुण भूमिकेत दिसली होती. तिच्या या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तसेच ती ‘साइलन्स २: द नाईट आऊल बार शूटआऊट’ या चित्रपटाचा देखील भाग होती. या चित्रपटात अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत आहेत.