बापरे..  इराणनंतर आता 'या' देशांवर संकट ! अमेरिका युद्धाच्या तयारीत ?
बापरे.. इराणनंतर आता 'या' देशांवर संकट ! अमेरिका युद्धाच्या तयारीत ?
img
Nandini khandare More

तीन ते चार महिन्यांपासून सुरु असलेला इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अखेर संपला असून आता या बातमीने संपूर्ण जगणेच सुटकेचा श्वास सोडलं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा एक टेन्शन वाढणारी बातमी समोर आली आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, इराण आणि अमेरिका संघर्ष शांतता कराराने मिटणार आहे. या युद्धानंतर आता अमेरिका आणखी तीन देशांविरुद्ध युद्धाची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. अहवालांनुसार अमेरिक संरक्षण मंत्रालयाने याबाबत प्राथमिक योजना तयार केली आहे. अमेरिकेच्या निशाण्यावर आगामी काळात क्यूबा, कोलंबिया आणि पेरू हे देश असल्याचे बोलले जात आहे. कारण हे तिन्ही देश अमेरिकेचे कट्टर विरोधक मानले जातात. विशेषतः क्यूबाबाबत अमेरिका यापूर्वीही अनेकदा कठोर इशारे देत आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत अमेरिकेने सुमारे 400 लहान-मोठ्या युद्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

इराण युद्धानंतर आता कम्युनिस्ट सरकार असलेला क्यूबा हा देश अमेरिकेच्या रडारवर असल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने क्यूबाच्या राष्ट्राध्यक्षांवर बक्षीस जाहीर केल्याची माहिती समोर आलेली आहे. तसेच क्यूबाच्या आसपास अमेरिकेने मोठ्या प्रमाणात नौदल तैणात केले आहे. 10 जून रोजी अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनी एका निवेदनात म्हटले की, ‘क्यूबाशी संबंधित कोणत्याही संभाव्य परिस्थितीसाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.’ तसेच काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी क्यूबाला अयशस्वी राष्ट्र असे म्हटले होते.

जानेवारी 2026 मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कोलंबियाविरुद्ध लष्करी कारवाईची शक्यता वर्तवली होती, मात्र कालांतराने हा मुद्दा शांत झाला, मात्र आता पुन्हा कोलंबियाविरोधात ट्रम्प आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. कारण दक्षिण अमेरिकेतील हा देश अमेरिकेचा विरोधक मानला जातो. कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांविरोधात अमेरिकेने अनेकदा आक्रमक विधाने केलेली आहेत.

पेरू
एकेकाळी अमेरिका आणि पेरू यांच्यातील संबंध अतिशय चांगले होते. मात्र, पेरूमध्ये वाढत असलेल्या कम्युनिस्ट प्रभावामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकांदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पेरूच्या जनतेला थेट इशारा देत म्हटले होते की, ‘येथे कम्युनिस्ट सरकार सत्तेत येऊ नये.’ मात्र या आवाहनानंतरही पेरूमध्ये डाव्या विचारसरणीच्या नेत्यांना यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकेचे प्रमुख विरोधक देश
चीन, रशिया आणि उत्तर कोरिया हे देखील अमेरिकेचे प्रमुख विरोधी देश मानले जातात. याशिवाय व्हेनेझुएला, कोलंबिया, मेक्सिको, पेरू आणि ब्राझील यांच्याशीही अमेरिकेचे संबंध अनेकदा तणावपूर्ण राहिले आहेत. त्यामुळे या देशांवर अमेरिकेकडून आगामी काळात कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group