आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप मिळणार नाही! काय आहेत औषधांचे नवे नियम ?
आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप मिळणार नाही! काय आहेत औषधांचे नवे नियम ?
img
Nandini khandare More

आता जून महिना उजाडला असून लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार असून आता पावसाळ्यात सर्दी खोकला हमखासपाने होतो. पावसाळ्यात औषधांना मोठ्या प्रमाणात मागणी असून कफ सिरपची देखील मोठ्या प्रमाणात मागणी असते . काही पेशंट तर डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय मेडिकल स्टोअर वरून कफ सिरप खरेदी करतात. परंतु आता आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कफ सिरप खरेदी करता येणार नाहीये. 

देशातील औषध विक्री आणि रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक अत्यंत मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, आता खोकल्याच्या सिरपसह कोणत्याही प्रकारची लिक्विड औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मेडिकल स्टोअरमध्ये मिळणार नाहीत. सरकारने 'ड्रग्स रूल्स, १९४५' मध्ये महत्त्वपूर्ण दुरुस्ती करून सिरपच्या ओव्हर-द-काउंटर विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

काही महिन्यांपूर्वी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरप प्यायल्याने निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या दुर्घटनेनंतर लहान मुलांच्या लिक्विड औषधांच्या सुरक्षिततेवर आणि दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. देशभरातून औषध निर्मिती आणि त्यांच्या विक्रीवर कडक देखरेख ठेवण्याची मागणी केली जात होती. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.

९ जून २०२६ च्या अधिसूचनेत नेमका काय बदल? आरोग्य मंत्रालयाने ९ जून २०२६ रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये या संदर्भातील एक मसुदा तयार करून त्यावर जनतेची मते मागवण्यात आली होती. त्यावर विचार केल्यानंतर हा अंतिम निर्णय घेण्यात आला. 'शेड्यूल K' मधून 'सिरप' शब्द बाद या नवीन बदलांतर्गत 'ड्रग्स रूल्स'च्या 'शेड्यूल K' मध्ये समाविष्ट असलेल्या औषधांच्या श्रेणीतून 'Syrups' (सिरप) हा शब्द पूर्णपणे हटवण्यात आला आहे. या एका शब्दामुळे आतापर्यंत अनेक सिरप डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय सहज विकले जात होते. मात्र, आता हा शब्द हटवल्यामुळे सर्व प्रकारची सिरप थेट कडक नियामक नियंत्रणाखाली आली आहेत.

नवीन नियम तात्काळ लागू अधिसूचनेनुसार, केंद्र सरकारने 'ड्रग्स अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट, १९४०' च्या कलम १२ आणि ३३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा बदल केला आहे. या नियमांना आता 'ड्रग्स (पाचवी सुधारणा) नियम, २०२६' असे म्हटले जाईल. सरकारी राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासूनच हे नियम देशभरात लागू झाले आहेत. या निर्णयामुळे आता नागरिकांना साध्या खोकल्याचे सिरप खरेदी करण्यासाठीही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मेडिकल चालकाला दाखवणे बंधनकारक असणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group