आजकाल विवाहबाह्य संबंधातून अनेक भयानक गुन्हे सध्या घडत असून अशीच घटना आता समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून एका पत्नीने प्रियकरासमवेत आपल्या पतीची हत्या केली असल्याची भयानक घटना घडली आहे.
बीडमधील लिंबागणेश येथे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पती किरण सोनवणेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने पतीला चिकन राईस आणायला पाठवून प्रियकराला हत्येची माहिती दिली. त्यानंतर प्रियकराने मित्रासह गळा आवळून खून करत अपघाताचा बनाव केला. पोलिसांनी डिजिटल पुराव्यांच्या आधारे पत्नी, प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
लिंबागणेश परिसरात प्रेम प्रकरणातून झालेल्या हत्या प्रकरणात नवा खुलासा झाला आहे. पत्नी प्रियांका हिनेच तिचा पती किरण याला चिकन राईस आणायला पाठवलं होतं. नंतर तिने प्रियकराला फोन केला आणि त्याने पतीचा काटा काढल्याचे उघड झाले आहे. खून केल्यानंतर प्रियकर दशरथ परदेशीने त्याची प्रेयसी प्रियांकाला फोन करून “कार्यक्रम ओके” असे सांगितले. त्यानंतर रात्री तब्बल चार ते पाच तास इंस्टाग्रामवरून त्यांचा एकमेकांशी संवाद झाल्याचेही तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीतील लिंबागणेश परिसरात 31 मे रोजी रोडलगत दुचाकीसोबत किरण सोनवणे नामक तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा अपघात असून त्यामुळेच मृत्यू झाल्याचे सुरुवातीला सर्वांनाच वाटलं. मात्र पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठववा, अहवाल आल्यावर सगळेच हादरले. किरणचा मृत्यू अपघाती नसून त्याची हत्या झाल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करून किरण सोनवणे याची पत्नी प्रियंका सोनवणे, तिचा प्रियकर दशरथ परदेशी आणि मित्र धीरज येडे या तिघांना अटक केली.
त्यांच्या चौकशीतून अनेक खुलासे झाले. पत्नी प्रियंका सोनवणे हिने किरणला चिकन राईस आणण्यासाठी पाठवले आणि याची माहिती तिने तिचा प्रियकर दशरथ परदेशी याला दिली. त्यानंतर दशरथ परदेशी याने मित्र धीरज येडे याच्यासोबत मिळून किरण सोनवणे याला गाठलं आणि गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर दुचाकी त्याच्या अंगावर ठेवून अपघाताचा बनाव त्यांनी रचला.
ह्या झाल्यानंतर दशरथ याने प्रियांकाला फोन करून “कार्यक्रम ओके” असा मेसेज कोडवर्डमध्ये दिला. यानंतर रात्री तब्बल चार ते पाच तास इंस्टाग्राम वरून कॉल द्वारे त्या दोघांचा संवाद सुरू होता. याप्रकरणी पोलिसांनी अनेक डिजिटल पुरावे हस्तगत केले असून न्यायालयात हजर केल्यानंतर तिघांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. प्रेम प्रकरणा असल्याने तसेच पती किरण सोनावणे हा दारू पिऊन प्रियांकाला वारंवार त्रास देत होता, त्यामुळे ही हत्या केली असं कारण आरोपींनी सांगितलं.