नीट पेपपरफुटी प्रकरणावरून कॉक्रोच जनता पार्टीने अकर्मक पवित्र घेत मोठं आंदोलन सुरु केलं दरम्यान, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी cjp ने दिल्लीसह देशभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन उभारलं होतं. या आंदोलनाला सर्वच स्तरातून मोठा पाठिंबा मिळाला. दरम्यान आंदोलनाचा वाढता दबाव पाहता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. परीक्षेतील त्रुटींबाबत विरोधी पक्ष आणि विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या सततच्या टीकेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
सध्या तरी, नवीन शिक्षणमंत्री किंवा त्या खात्याच्या वाटपाबाबत राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. परंतु राजकीय वर्तुळात एखाद्या नवीन चेहऱ्याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलावले आहे. अमित शाह यांचा निरोप मिळताच फडणवीस नागपूरहून दिल्लीकडे रवाना झालेत. त्यामुळे त्यांची शिक्षणमंत्रिपदी वर्णी लागू शकते असं म्हटलं जातंय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही याप्रकरणी दावा केलाय. देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय शिक्षणमंत्री होतील असा दावा त्यांनी केलाय . प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर फडणवीस यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आलंय, त्यावरून बोलताना संजय राऊत म्हणालेत.
दरम्यान शिक्षण मंत्रालयात सध्या कार्यरत असलेल्या राज्यमंत्र्यांकडे तात्पुरता किंवा पूर्ण कार्यभार सोपविला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये आरएलडी (RLD) प्रमुख आणि शिक्षण व कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी, तसेच पश्चिम बंगालमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि शिक्षण राज्यमंत्री सुकांत मजुमदार यांसारख्या प्रमुख नावांचा समावेश आहे.