मोशी इमारत दुर्घटना ! ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकल्याची भीती; नेमकं काय घडलं ?
मोशी इमारत दुर्घटना ! ढिगाऱ्याखाली अजूनही 8 जण अडकल्याची भीती; नेमकं काय घडलं ?
img
Nandini khandare More

पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे एक धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली आहे.  पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेनंतर बचावकार्य दुसऱ्या दिवशीही युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत ९ जणांची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले असून, ढिगाऱ्याखाली आणखी ८ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ही दुर्घटना काल घडली असून, त्यानंतर तातडीने बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली. घटनास्थळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, लष्कराचे जवान, पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय पथके सातत्याने कार्यरत असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून, आपल्या प्रियजनांची सुखरूप सुटका व्हावी या आशेने ते घटनास्थळीच थांबले आहेत. परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाकडून बचावकार्य अधिक वेगाने सुरू ठेवण्यात आले आहे.


 नक्की काय घडलं ? 

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी कचरा डेपो येथे बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास कचऱ्याचा डोंगर डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या कार्यालयावर कोसळला. हजारो टन कचरा इमारतीवर कोसळल्याने तीन मजली इमारत कोसळून त्यात १८ कामगार अडकले. दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिका अग्निशमन दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ ), भारतीय सैन्य दलाचे  जवान  शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group