एल निनोचं संकट घोंगावतंय !  IMD चा चिंता वाढवणारा नवा अंदाज
एल निनोचं संकट घोंगावतंय ! IMD चा चिंता वाढवणारा नवा अंदाज
img
Nandini khandare More

अपेक्षित मान्सूनने अजूनही हजेरी लावलेली नसल्याने मान्सून ची चिंता अधिकच वाढत चालली आहे. याच दरम्यान आता एक मोठी आणि चिंता वाढवणारी अपडेट समोर आली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार , देशावर सध्या एल निनोचं महासंकट आहे. दरम्यान, आता एली निनोच्या महासंकटाविषयी नवा आणि चिंता वाढवणारा अंदाज समोर आला आहे. आयएमडीच्या प्रमुखानीच याविषयी सविस्तर सांगितले आहे.

एल निनो या जून महिन्याच्या सुरुवातील प्रशांत महासागरात सक्रिय झाला आहे. नव्या अंदाजानुसार आता एल निनोचा प्रभाव सप्टेंबर महिन्यानंतर जास्त वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यावेळी एल निनोचा प्रभाव मान्सूननंतरही कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाचे प्रमुख डॉ. मृत्यूंजय महापात्र यांनी याविषयी माहिती दिली आहे. सोबतच नागरिकांनी घाबरून जाऊ नये. एल निनोच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी शासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. महापात्र यांच्या मतानुसार जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या सुरुवातीच्या काही दिवसात एल निनोचा प्रभाव मध्यम स्वरुपाचा राहील. त्यानंतर एल निनोचा प्रभाव वाढत जाईल. हवामान विभागाचे याकडे पूर्ण लक्ष आहे. सोबतच जेव्हा-जेव्हा गरज असेल तेव्हा-तेव्हा हवामान विभागाकडून शेतकरी तसेच सामान्यांना माहिती देत राहू, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

ज्या भागात पाऊस कमी होणार आहे, तिथे…..
दरम्यान, डॉ. महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार एल निनोचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आयएमडीने याआधीच राज्यांना तसेच केंद्र सरकारला काय काळजी घ्यायला हवी, हे अगोदरच सांगितलेले आहे. ज्या भागात पाऊस कमी होणार आहे, तिथे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. बियाणांची अपलब्धता, जलव्यवस्थापन, पर्यायी पिके यावर सरकारकडून विशेष लक्ष दिले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group