व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र शिंदे यांचे निधन
व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र शिंदे यांचे निधन
img
दैनिक भ्रमर
 नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- नाशिकचे व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र रामचंद्र शिंदे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय ६५ वर्ष होते. नाशिकची राष्ट्रीय खेळाडू राजश्री शिंदे यांचे ते वडील होते .राजेंद्र शिंदे यांचे प्राथमिक शिक्षण बिटको हायस्कूल येथे झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण बी.वाय. के. महाविद्यालयात झाले. सुरुवातीपासूनच त्यांना व्हॉलीबॉल या खेळाची आवड होती. याच वेळी त्यांनी एनआयएसमध्ये प्रशिक्षकाचे अधिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी अनेक खेळाडूंना घडवले. अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळले.

गेल्या २२ वर्षांपासून ते व्हॉलीबॉल प्रशिक्षण देण्याचे काम करत होते. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालनंतरही त्यांनी प्रशिक्षणाचे काम सुरूच ठेवले होते. त्यांच्या निधनाने नाशिकच्या क्रीडाक्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिंदे यांच्यावर आज सायंकाळी ५ वाजता नाशिकच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group