सध्या ठाकरे गटाला मोठे हादरे बसत असून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. एक महिला नेत्याने आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. थोड्याच वेळात शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
समोर आलेल्या माहितीनुसार ठाकरे सेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी धुळ्यावरून हजारो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुभांगी पाटील यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही काळापासून शुभांगी पाटील या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या, मात्र शुभांगी पाटील यांनी या चर्चा फेटाळल्या होत्या. मात्र आता शुभांगी पाटील यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना शुभांगी पाटील यांनी सांगितले की, ‘उद्धव ठाकरे साहेबांवर कुठल्याही प्रकारची नाराजी नाही परंतु हजारो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आग्रहास्तव मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे शुभांगी पाटील यांनी स्पष्ट केले आहे.