अभिजीत दिपके यांच्या आंदोलनानंतर अरविंद केजरीवालही सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आणि त्यांनी E20 इंधनाचा मुद्दा घेतला. आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याच मुद्द्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरावर मोर्चा घेऊन निघाले. पोलिसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवली आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या काही मार्गांवर बॅरिकेट लावण्यात आली.
दरम्यान ,अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाप्रमाणे आपल्यालाही तसेच मोठे यश मिळेल, असा अंदाज अरविंद केजरीवाल यांचा आहे.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन यामुळे बीजेपी एक पाऊल मागे सरकल्याचे बोलले जातंय. त्यातच अरविंद केजरीवाल मैदानात उतरले. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारल्यानंतरही त्यांनी मोर्चा काढला. डिजीटल पद्धतीने त्यांनी E20 इंधनाविरोधात सह्यांची मोहिम घेतली. मात्र, जेवढी हवा त्यांनी E20 इंधनाच्या मुद्द्याची केली. तेवढा प्रतिसाद नक्कीच त्यांना मिळाला नाही.
अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाप्रमाणे आपल्यालाही आंदोलनाला प्रतिसाद मिळेल, असे अरविंद केजरीवाल यांना वाटले पण म्हणावा तेवढा प्रतिसाद मिळाच नाही. 100 कार्यकर्ते घेऊन अरविंद केजरीवाल पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे निघाले. यादरम्यानच अरविंद केजरीवाल यांनी मोठे विधान केले.
अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, अमेरिकेकडून इथेनॉल खरेदी करून देशातील गाड्यांमध्ये टाकले जात आहे. ज्यामुळे गाड्या खराब होत आहेत आणि देशातील लोक दुखी आहेत. कारण आपले पंतप्रधान कमजोर आहेत. E20 जर पूर्ण देशभवर थोपवले जात असेल तर हे फक्त एकटे गडकरी करूच शकत नाही. हे मोदींचा आणि कॅबिनेटचा निर्णय आहे. तिथेच गडकरी, पुरी यांचे कोणाचेही काहीही चालत नाही.हा जो निर्णय आहे तो मोदींचा आणि कॅबिनेटचा आहे.