सोनं झालं स्वस्त! १ तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये; वाचा आजचे दर
सोनं झालं स्वस्त! १ तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये; वाचा आजचे दर
img
Nandini khandare More
सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजची मोठी बातमी आहे. सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली असून, ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार सुरू असताना आजच्या घसरणीमुळे बाजारात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे सुवर्णनगरीतील आजचा सोन्याचा भाव किती आहे आणि १ तोळे सोने खरेदी करण्यासाठी नेमके किती रुपये मोजावे लागणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात पुन्हा बदल झाला आहे. आज २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ५०० रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात आज कोणताही बदल झाला नाही.

जळगाव सुवर्ण बाजारात गेल्या आठवड्याच्‍या सुरुवातीला सोने-चांदीचे भाव कमी झाले होते. त्यानंतर सलग तीन दिवस भावात घसरण झाली. मात्र, आठवड्याच्‍या शेवटी सोनं– चांदीच्‍या दरात फारसा बदल झाला नसल्‍याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच मागील ३ दिवसांपासून चांदीचे दर स्थिरावले असून सोन्‍याच्‍या दरात देखील किरकोळ घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात रोज होणारी घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्‍याने होत असलेल्‍या बदलाचा परिणाम सोनं-चांदीच्या बाजारात होत असतो. दरात सातत्याने बदल होत असताना गेल्‍या आठवड्याच्‍या सुरुवातीपासूनच सोने-चांदीचे भाव कमी झाले हेाते. पहिल्‍या ३ दिवसांत सोनं- चांदीचे भाव कमी झाले होते. पण बुधवारी २ तारखेपासून दरात स्थिरता आली आहे. हिच स्थिती आज ७ सप्टेबरला म्हणजे आठवड्याच्‍या पहिल्‍याच दिवशी देखील कायम राहिली आहे.

६ सप्‍टेंबरला २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचा विनाजीएसटी भाव १ लाख ५२ हजार रुपयांवर होता. हे दर आज ७ सप्टेंबर रोजी ५०० रूपयांनी कमी होवून १ लाख ५१ हजार ५०० रूपयांवर आले आहेत. तर चांदीचे प्रतिकिलो भाव गेल्या ३ दिवसांपासून विनाजीएसटी २ लाख ३६ हजार रूपयांवर कायम आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group