शिवसेना-धनुष्यबाणाचा फैसला कुणाच्या बाजूने? सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी
शिवसेना-धनुष्यबाणाचा फैसला कुणाच्या बाजूने? सुप्रीम कोर्टात आज महत्वाची सुनावणी
img
Nandini khandare More

राज्यातील राजकरणात मोठ्या घडामोडींना वेग आला असून गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वाद सुरु असून आता   शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. दुपारी २ वाजता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. शिंदेसेनेचे वकील नीरज किशन कौल युक्तिवाद करणार आहेत. गेल्या सुनावणीत कोर्टानं चिन्ह गोठवून दोन्ही गटांना नवी चिन्हं का दिली नाहीत? असा सवाल केला होता. त्यावर सर्व अधिकार निवडणूक आयोगाचे असून त्यांनी नियमानुसार निर्णय घेतल्याचा युक्तिवाद शिंदेंच्या पक्षानं कोर्टासमोर केला होता. 

आजच्या सुनावणीमध्ये कोर्टात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचे राहिल. शिवसेना पक्ष आणि चिन्ही कुणाचे हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टात अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुरू असलेला युक्तीवाद संपला आहे. आता शिवसेना शिंदेगटाचा युक्तीवाद सुरू आहे. मागच्या सुनावणीवेळी बाळासाहेब ठाकरेंची बनवलेली पक्षघटना उद्धव ठाकरेंनी का चुकीच्या पद्धतीने बदलली असा सवाल शिंदेसेनेच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला होता. आजच्या सुनावणीत देखील शिंदेसेना काय युक्तीवाद करते आणि कोर्टात नेमकं काय घडतंय त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group