परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंचा आणखी एक मोठा निर्णय ! आज दुपारी 12 वाजता कुठली घोषणा करणार?
परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगेंचा आणखी एक मोठा निर्णय ! आज दुपारी 12 वाजता कुठली घोषणा करणार?
img
Nandini khandare More
राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आक्रमक झाले असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला रविवारी आझाद पोलीस स्टेशनने परवानगी नाकारली. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी कालपासून सलाईन देखील घेण्यास बंद केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी कोर्टात जाण्याची देखील तयारी दर्शवली आहे. परवानगी नाकारल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगेंनी मध्यरात्री उपचार देखील नाकारले. त्यानंतर आज सोमवारी मनोज जरांगे पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सोमवारी सतरावा दिवस आहे. आझाद मैदानावरील आंदोलनाची परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी उपचार, पाणी बंद केलं आहे. त्यानंतर जरांगे पाटील हे दुपारी बारा वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. अंतरवारी सराटीत रात्री दोन वेळा वैद्यकीय पथक तपासणी करून परत गेले. परंतु त्यांनी उपचार घेण्यास नकार दिल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून दुसऱ्यांदा आझाद मैदान पोलिसांना नव्याने परवानगीसाठी अर्ज करण्यात आलाय. परवानगी नाकारल्यास पुन्हा कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे. तर आज सोमवारी दुपारी बारा वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या आजच्या घोषणेमुळे सरकारसमोर नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाटोदामध्ये जरांगे पाटलांचा पहिला मुक्काम
मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जाताना 15 तारखेचा पहिला मुक्काम बीडच्या पाटोदा शहरात असणार आहे. काल पाटोदा शहरात पूर्व नियोजन बैठक पार पडली, यानंतर 80 एकरवर वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात आहे, तर 25 ठिकाणी पार्किंगसह अन्नछत्र उभारण्याचे काम सुरू आहे. परवानगी नाकारल्यानंतर देखील जरांगे पाटलांसह मराठा बांधव मुंबईत जाण्यावर ठाम असून जोरदार तयारी सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group