आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ! नाशिक जिल्ह्यातील घटना
आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या ! नाशिक जिल्ह्यातील घटना
img
दैनिक भ्रमर

नाशिक भ्रमर प्रतिनिधी :- जोपुळ येथील आश्रम शाळेतील सोळा वर्षीय विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरिदास अंबादास शेकरे (वय 16, रा. दळवट, ता. सुरगाणा) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हरिदास हा नेहमीप्रमाणे प्रार्थनेला न दिसल्याने मुख्याध्यापकांनी तो का आला नाही याची माहिती घेतली. त्याच्या खोलीमध्ये जाऊन पाहिले असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला.

शिक्षकांनी त्वरित त्याला पिंपळगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. हरिदासने आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group