ताप आल्यानं प्रकृती खालावली, रुग्णालयात नेलं अन्...; आश्रम शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
ताप आल्यानं प्रकृती खालावली, रुग्णालयात नेलं अन्...; आश्रम शाळेत शिकणाऱ्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
img
Nandini khandare More

नाशिकच्या कळवण तालुक्यातील विसरवाडी येथील आश्रमशाळेतून एक दुर्दैवी आणि हृदयद्रावक  घटना समोर आली आहे.  एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे विसरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सृष्टीला ताप आल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून तिच्यावर उपचारसुरू होते. प्रकृती बिघडल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार केल्यानंतर सृष्टीला पुन्हा आश्रमशाळेत आणण्यात आले होते. मात्र, त्यानंतर तिला अचानक उलटी आणि ताप आला. यानंतर तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. सृष्टी ओंकार सूर्यवंशी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. 

 दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी विद्यार्थिनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच सृष्टीच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group