डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना  मारहाण !
डीजेविरोधात आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण !
img
Nandini khandare More
पुण्यामध्ये डीजेच्या दणदणाटाला विरोध करणारे कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. गणेशोत्सवामध्ये डीजे नको अशी भूमिका सातत्याने मांडणाऱ्या बापट यांना काही तरुणांनी टिळक रोड परिसरात मारहाण केली.  विशेष म्हणजे ऑन कॅमेरा मारहाण झाली आहे. पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या टिळक रोडवर हा प्रकार घडला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विद्यानंद बापट हे टिळक रोड परिसरात गणेशोत्सवातील डीजे आणि आवाजाच्या त्रासाबाबत प्रत्यक्ष नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत होते. यावेळी स्थानिक एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. वाद वाढल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी विद्यानंद बापट यांना भरचौकात बेदम मारहाण केली.

डीजेच्या दणधणाटाविरोधात सातत्याने आवाज उठवल्यामुळेच विद्यानंद बापट हे गणेश मंडळांच्या निशाण्यावर होते, असं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, मारहाण करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू केला आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group