अलीकडे वाहनांच्या अपघाताचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. दरदिवशी अनेक भीषण अपघातांच्या घटना गह्द्तच आहेत. दरम्यन आता येवला-नांदगाव रस्त्यावरभीषण अपघाताची थरारक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येवला-नांदगाव राज्यमार्गावर सोमवारी, (दि. ५) पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर मालवाहतूक आयशर आदळली. या अपघातात आयशर चालक श्रीकांत चव्हाण (रा. लातूर) यांचा जागीच ठार झाला.
तर गंभीर जखमी मनोज राठोड यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.
नागरिकांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून रुग्णवाहिकेच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अपघाताचागुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.