मोठी बातमी ! २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; नाशिकसह ३६ जिल्ह्यांतील आकडे समोर
मोठी बातमी ! २ कोटीहून अधिक मतदार यादीतून बाहेर; नाशिकसह ३६ जिल्ह्यांतील आकडे समोर
img
Nandini khandare More

महाराष्ट्रातील मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नव्या प्रारुप मतदार यादीतून तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. पत्ता बदलणे, मृत्यू, दुबार नोंदणी आणि आवश्यक फॉर्म न भरल्यासारख्या कारणांमुळे ही नावे वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, नाव वगळले गेले असले तरी नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबरदरम्यान दावा आणि हरकत दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे.

राज्यातील तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार (२१.१४%) मतदारांची नावे प्रारुप यादीतून वगळण्यात आली आहेत. यामध्ये पुणे, ठाणे आणि मुंबईतील मतदारांचा सर्वाधिक समावेश आहे. परंतु, हे नाव कायमस्वरूपी वगळलेले नसून, नाव दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्याची संधी दिली आहे. तुमचे नाव यादीत आहे की नाही, हे तपासण्यासाठी नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर (voters.eci.gov.in) जाऊन पाहू शकतात

पुनरीक्षणापूर्वी राज्यात एकूण ९,७८,५४,०४९ (सुमारे ९ कोटी ७८ लाख) मतदार होते. परंतु, प्रसिद्ध झालेल्या प्रारुप यादीत २,०६,८८,४८७ (तब्बल २ कोटी ६ लाख ८८ हजार - २१.१४%) मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. म्हणजेच, राज्यातील सुमारे २१ टक्के मतदारांची नावे सध्यातरी मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, मतदारांचे 'गणना प्रपत्र' (Enumeration Form) प्राप्त न झाल्यामुळे या २ कोटींहून अधिक मतदारांचा समावेश प्रारुप यादीत करता आलेला नाही. १) मतदार नोंदणीकृत निवासाच्या ठिकाणी गैरहजर असणे किंवा न सापडणे. २) संबंधित पत्त्यावरून इतरत्र स्थलांतरित झालेले असणे. ३) मतदाराचा मृत्यू झालेला असणे. ४) अन्य ठिकाणी नोंदणी झालेली असणे किंवा दुबार नाव असणे. ५) मतदारांनी गणना प्रपत्र भरून देण्यास नकार देणे. कुठल्या जिल्ह्यात किती मतदार वगळले? (जिल्हावार संपूर्ण यादी) निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शहरी आणि औद्योगिक जिल्ह्यांमध्ये मतदार वगळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे आणि ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी २८ लाखांहून अधिक, तर मुंबई उपनगरात २६ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली गेली आहेत.

कोणत्या जिल्ह्यातील किती नावे वगळली?

नंदुरबार (Nandurbar) - १,८८,७२९ धुळे (Dhule) - २,९४,८५७ जळगाव (Jalgaon) - ५,१४,७४३ बुलढाणा (Buldhana) - १,९०,९३७ अकोला (Akola) - २,७६,९९२ वाशीम (Washim) - १,३४,२५० अमरावती (Amaravati) - ३,५३,२८२ वर्धा (Wardha) - १,७८,१७८ नागपूर (Nagpur) - १४,४३,२६७ भंडारा (Bhandara) - १,३३,३७१ गोंदिया (Gondia) - १,६०,६४३ गडचिरोली (Gadchiroli) - ९०,६०३ चंद्रपूर (Chandrapur) - २,७०,१०४ यवतमाळ (Yavatmal) - २,६४,९४८ नांदेड (Nanded) - ३,८८,३५२ हिंगोली (Hingoli) - ८५,३०९ परभणी (Parbhani) - १,८०,२३१ जालना (Jalna) - २,४३,१८३ छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) - ६,०७,६६० नाशिक (Nashik) - १०,२७,७९२ ठाणे (Thane) - २८,५९,३७७ मुंबई उपनगर (Mumbai Suburban) - २६,५८,२०२ मुंबई शहर (Mumbai City) - ९,५०,७२० रायगड (Raigad) - ५,८४,११८ पुणे (Pune) - २८,६६,४८१ अहिल्यानगर () - ४,२६,९१५ बीड (Beed) - २,४०,४०७ लातूर (Latur) - २,१४,४४२ धाराशिव (Osmanabad) - १,८१,५४५ सोलापूर (Solapur) - ६,२२,६७१ सातारा (Satara) - ३,४१,९०५ रत्नागिरी (Ratnagiri) - १,३१,५६९ सिंधुदुर्ग (Sindhudurg) - ८२,५१३ कोल्हापूर (Kolhapur) - ४,४९,२१३ सांगली (Sangli) - ३,८२,२६९ पालघर (Palghar) - ६,६८,७०९ संपूर्ण महाराष्ट्र (Total) - २,०६,८८,४८७


इतर बातम्या
Join Whatsapp Group