संतापजनक ! धावत्या बसमध्ये मद्यधुंद व्यक्तीकडून  महिलेच्या अंगावर लघुशंका ?कुठे घडला प्रकार
संतापजनक ! धावत्या बसमध्ये मद्यधुंद व्यक्तीकडून महिलेच्या अंगावर लघुशंका ?कुठे घडला प्रकार
img
Nandini khandare More
स्त्रियांसोबत घडणाऱ्या गुन्ह्यांमद्ये वाढ असून आता आजची स्त्री ही कुठेही सुरक्षित नाही. उलट आता तर दिवसेंदिवस स्त्रियांसोबत अणे विचित्र प्रकार घडत आहेत. दरम्यान, आता अहिल्यानगर येथे एका महिलेसोबत घडलेला एक अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. अहिल्यानगर येथे चालत्या बस मध्ये एका मद्यधुंद व्यक्तीने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. परभणी जिल्ह्यातील कळमनुरी येथून पिंपरी चिंचवडकडे निघालेल्या बसमध्ये हा प्रकार घडला आहे. 

समोर आलेल्या माहितीनुसार, या बस मध्ये कळमनुरी येथून बसलेल्या महिलेच्या अंगावर बीड जिल्ह्यातील उमापूर येथून बसलेल्या एका व्यक्तीने लघुशंका केल्याची  घडली आहे. उमापूर येथून मद्यधुंद अवस्थेत बसलेला व्यक्तीने पहाटेच्या वेळेस महिलेच्या अंगावर लघु शंका केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बसमध्ये लाईट लावण्यात आली आणि इतर प्रवाशांनी त्याला बस बाहेर काढले.

सोबतच पोलिसांना देखील घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी लघुशंका करणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला ताब्यात घेतलं मात्र कोणाचीही तक्रार नसल्याने काही वेळानंतर समज देऊन सोडलं आहे. मात्र, चालत्या गाडीमध्ये महिलांच्या अंगावर लघुशंका केली जाते, ही घटना अत्यंत गंभीर असून मद्यधुंद अवस्थेतील प्रवाशांना बस गाडीत प्रवेश द्यायचा की नाही या प्रश्नासह महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सरकारी बस असो वा खासगी बस महिलांना वेगवेगळ्या प्रकारे टार्गेट करुन त्रास दिला जातो.
इतर बातम्या
Join Whatsapp Group