Asian Games 2026 स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वीच भारतीय क्रीडा विश्वाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार कुस्तीपटू मुकुल डोपिंग चाचणीत अडकला असून, राष्ट्रीय डोपिंगविरोधी संस्थेने (NADA) त्याच्यावर तात्पुरते निलंबनाची कारवाई केली आहे. त्यामुळे Asian Gamesमधील भारताच्या कुस्तीच्या पदकाच्या आशांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. जापानमध्ये 19 सप्टेंबरपासून एशियन्स गेम्स 2026 स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पदकासाठी प्रबळ दावेदार असलेल्या आणइ 86 किलो फ्रीस्टाईल कॅटेगरीतील कुस्तीपटू मुकुल दहिया डोप टेस्टमध्ये फेल गेला आहे.
नॅशनल अँटी डोपिंग एजेंसीने मुकुल दहियाच्या सँपलमध्ये बंदी घातलेला मेफेंटरमाइन पदार्थ आढळला आहे. त्यानंतर त्याच्या कारवाई करत सस्पेंड केलं आहे. एशियन चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत मुकुल दहियाने रौप्य पदक पटकावलं होतं. इतकंच यातर एशियन गेम्स स्पर्धेसाठी जाणाऱ्या फ्रीस्टाईल गटासोबत आर्मेनियाच्या येरेवानमध्ये सराव करत होता. डोप टेस्टमध्ये फेल गेल्यानंतर मुकुल दहिया एशियन गेम्स 2026मध्ये खेळणं कठीण मानलं जात आहे. भारताचं 86 किलो वजनी कॅटेगरीत खेळाडूशिवाय जावं लागणार आहे
WFIने जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतीय ऑलिम्पिक संघाला शेवटच्या खेळाडूंची यादी पाठवली होती. आता दिलेला अवधी संपल्याने मुकुल दहियाच्या जागी दुसऱ्या कुस्तीपटूला पाठवणं कठीण आहे.भारतीय कुस्तीला डोपिंगचं ग्रहण लागलं असून दुसरं प्रकरण समोर आलं आहे. यापूर्वी ग्रीको रोमन कुस्तीपटू दीपांशुही डोप चाचणीत फेल गेला होता. त्यानंतर त्याला सस्पेंड केलं होतं.