''या'' बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का ! आता पैसे काढण्यासाठी... नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू
''या'' बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का ! आता पैसे काढण्यासाठी... नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू
img
Nandini khandare More
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आता एक मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. आता SBI ग्राहकांना पैसे काढण्यासाठी काही नियम लावण्यात आले आहे. ते जाणून घेऊया. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खातेधारकांसाठी सेवा शुल्कात बदल केले आहेत. बँकेने शाखेमार्फत रोख पैसे काढण्याच्या व्यवहारांशी संबंधित नियम बदलले आहेत. हे नवे नियम १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होतील.

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२६ पासून एका महिन्यात केवळ चार वेळाच निशुल्क पैसे काढता येणार आहेत. पहिल्या चार मोफत व्यवहारांनंतर केल्या जाणाऱ्या प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी १५ रुपये अधिक जीएसटी इतके शुल्क आकारले जाईल.

‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खाते म्हणजे काय?
‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खाती प्रामुख्याने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असतात. कोणत्याही शुल्काचा बोजा न पडता त्यांना बचतीची सवय लागावी, हा

‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खाते म्हणजे काय?
‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खाती प्रामुख्याने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असतात. कोणत्याही शुल्काचा बोजा न पडता त्यांना बचतीची सवय लागावी, हा यामागचा उद्देश आहे.

‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खात्याची मुख्य वैशिष्ट्ये
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या खात्यामध्ये किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट नाही. मात्र, यात चेकबुकची सुविधा उपलब्ध नसते. पैसे काढण्यासाठी केवळ बँकेच्या शाखेत जाऊन ‘विड्रॉवल फॉर्म’चा वापर करावा लागतो किंवा एटीएमचा वापर करता येतो. खातेदाराला ‘रुपे’ एटीएम-कम-डेबिट कार्ड दिले जाते.

एसबीआयमध्ये ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खाते उघडण्यासाठी निकष
जे एसबीआय ग्राहक हे ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक खाते’ उघडतात त्यांच्याकडे दुसरे कोणतेही बचत खाते असू नये. जर ग्राहकाकडे आधीच एखादे बचत खाते असेल, तर बँकेत हे ‘बेसिक सेव्हिंग्ज बँक खाते’ उघडल्यापासून ३० दिवसांच्या आत ते खाते बंद करावे लागते.

दरमहा चार वेळा रोख रक्कम काढण्याची सुविधा मोफत
एसबीआय बचत खाते उघडणाऱ्या ग्राहकांसाठी दरमहा जास्तीत जास्त चार वेळा रोख रक्कम काढणे मोफत असते. यामध्ये स्वतःच्या आणि इतर बँकांच्या एटीएममधून पैसे काढणे, बँकेच्या शाखेतून पैसे काढणे आणि AEPS द्वारे रोख व्यवहार करणे यांचा समावेश आहे.

कोणत्या सेवा मोफत आहेत?
‘बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट’ खातेधारकांना ‘रुपे’ एटीएम-कम-डेबिट कार्ड मोफत दिले जाते आणि त्यासाठी कोणतेही वार्षिक देखभाल शुल्क आकारले जात नाही. NEFT/RTGS सारख्या इलेक्ट्रॉनिक पेमेंट माध्यमांद्वारे होणारी रक्कम जमा करण्याची सुविधाही अशा एसबीआय खातेधारकांसाठी मोफत असते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group