नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. १० आणि ११ नोव्हेंबर रोजी देशातील काही शहरांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे चेक जमा करणे, पैसे काढणे किंवा इतर बँकिंग कामांसाठी जाण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासून घेणे आवश्यक आहे. नेमक्या कोणत्या शहरांमध्ये बँका बंद राहणार? तुमच्या शहराचा या यादीत समावेश आहे का? जाणून घ्या सविस्तर...
विशेष म्हणजे, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी देशातल्या काही निवडक शहरांमध्ये बँकांना सुट्टी असणार आहे. त्यामुळे बँकेत जाण्याआधी तुमच्या शहरातल्या सुट्ट्यांची माहिती जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
१० नोव्हेंबरला कुठे बँका बंद राहणार? मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी मुंंबई, अहमदाबाद, नागपूर, बेलापूर, बंगळुरू, डेहराडून आणि गंगटोक या ठिकाणी RBI केंद्रांशी संबंधित बँकांना सुट्टी असेल. या दिवशी संबंधित शहरांमधल्या बँकांच्या शाखांमध्ये ग्राहकांना नियमित काउंटर सेवा वापरता येईल. चेक क्लिअरन्ससारख्या कामांना पुढच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत वाट पाहायला लागू शकते.
११ नोव्हेंबरला या शहरांमध्ये बँका बंद बुधवार, ११ नोव्हेंबर रोजी कोलकाता, लखनऊ, कानपूर, शिमला, इंफाळ आणि गंगटोक या शहरांमध्ये बँकांना सुट्टी असेल. त्यामुळे या शहरांमध्ये बँकेत जाऊन पैसे जमा करणे, चेक जमा करणे, डिमांड ड्राफ्ट बनवणे किंवा लॉकरचा वापर करणे यांसारखी कामे करता येणार नाहीत.
डिजिटल बँकिंग सेवा सुरू राहणार बँकांच्या शाखा बंद असल्या तरी ग्राहकांना डिजिटल व्यवहार करता येतील. UPI आणि IMPS सेवा नेहमीसारख्याच सुरू राहतील. तसेच नेट बँकिंगच्या माध्यमातून NEFT आणि RTGS द्वारे पैसे ट्रान्सफर करता येतील. ATM मधून पैसे काढण्याची सुविधाही सुरू राहणार आहे. मात्र, सुट्ट्यांमुळे काही ठिकाणी ATM मध्ये पैसे भरायला उशीर होऊ शकतो. शेअर बाजाराचे कामकाजही राहणार बंद १० नोव्हेंबर रोजी NSE आणि BSE या दोन्ही शेअर बाजारांमध्ये पूर्ण दिवसाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपले व्यवहार आणि आर्थिक नियोजन त्यानुसार करणं महत्त्वाचं आहे