रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; SBIसह 'या' तीन बँकांना ठोठावला 'इतक्या' कोटींचा दंड
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई; SBIसह 'या' तीन बँकांना ठोठावला 'इतक्या' कोटींचा दंड
img
Dipali Ghadwaje
आरबीआयने देशातील बहुतांश बँकांवर कारवाई केली आहे. आता RBI ने स्टेट बँक ऑफ इंडियाला दंड ठोठावला आहे. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एसबीआयवर ही कठोर कारवाई करण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

या प्रकरणाची माहिती देताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्टेट बँकेसह इतर काही बँकांनाही दंड ठोठावण्यात आला आहे.  

नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल स्टेट बँक ऑफ इंडियाला दंड ठोठावण्यात आला आहे, असे आरबीआयने सोमवारी सांगितले. एसबीआयला 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड ठेवीदार एज्युकेशन अवेअरनेस फंड आणि कंपनीच्या पेड-अप शेअर कॅपिटलच्या 30% पेक्षा जास्त असलेल्या कंपनीमधील शेअरहोल्डिंगशी संबंधित उल्लंघनामुळे आहे.  
 
दरम्यान या प्रकरणात, आरबीआयने पुढे सांगितले की सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने काही कंपन्यांच्या पेड-अप शेअर भांडवलाच्या 30% पेक्षा जास्त रकमेचे शेअर्स तारण ठेवले आहेत.

कॅनरा बँकेलाही दंड ठोठावला
याशिवाय आरबीआयने नियमांचे पालन न केल्याबद्दल कॅनरा बँक लिमिटेडला 32.30 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. आरबीआयच्या म्हणण्यानुसार असे आढळून आले की कॅनरा बँकेने 31 मार्च 2021 पर्यंत खात्यांशी संबंधित नियमांचे पालन केले नाही.

युनियन बँकेलाही दंड ठोठावला
आरबीआयने नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता वळवण्याशी संबंधित उल्लंघनासाठी सिटी युनियन बँकेला 66 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

ओशन कॅपिटल मार्केट लिमिटेडवरही कारवाई
आरबीआयने सांगितले की, ओडिशातील राउरकेला येथे असलेल्या ओशन कॅपिटल मार्केट लिमिटेडवर 16 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. कंपनीवर एनबीएफसी संबंधित नियमांचे पालन न केल्याचा आरोप होता. तपासानंतर RBI वेळोवेळी अशी कारवाई करत असते. तपासणीत आढळलेल्या त्रुटींनंतर हा दंड ठोठावण्यात आल्याचे केंद्रीय बँकेने म्हटले आहे.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?
बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दंड आकारला जातो. तो दंड फक्त बँकांना भरावा लागतो. यामध्ये खातेदारांना कोणताही दंड भरावा लागत नाही. हा दंड फक्त बँकेलाच भरावा लागतो. त्यामुळे या बँकांवर आरबीआयने लादलेल्या आर्थिक दंडाचा बँक ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
इतर बातम्या
Join Whatsapp Group