दोन हजार रुपयांचा नोटा शिल्लक असणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ज्या लोकांकडे अजून २००० च्या नोटा आहेत, त्यांच्यासाठी आरबीआयकडून एक नवीन माहिती देण्यात आलीय.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत त्या परत बँकेत जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
बाद झालेल्या नोटांपैकी जवळपास 97.76 टक्के नोटा बँकिंग सिस्टममध्ये परत आल्यात. तर 7,961 कोटी रुपयांच्या 2000 रुपयांच्या नोटा अजून लोकांकडे असल्याची माहिती सेंट्रल बँकेने दिली आहे. ज्या लोकांकडे अजून अजूनही 2000 च्या नोटा त्या त्वरीत बँकेत जमा करण्याचे सूचना करण्यात आल्यात. या नोटा आता पोस्ट ऑफिस मध्ये स्वीकारल्या जाणार आहेत.
नागरिकांकडे शिल्लक असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा पोस्ट ऑफिस ने स्वीकाराव्यात अशा रिझर्व बँकेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अशाप्रकारे जमा करा नोटा
ज्या लोकांकडे २००० हजार रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरिक पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या नोटा जमा करू शकणार आहेत. पोस्ट ऑफिसमार्फत स्पीड पोस्टाने या नोटा रिझर्व बँकेच्या देशभरातील 19 क्षेत्रिय कार्यालयांमध्ये पाठवल्या जाणार आहेत.
नागरिकांना दोन हजार रुपयांच्या नोटा विवरणासह पोस्ट ऑफिसच्या काउंटरवर जमा करायच्या आहेत. त्यानंतर या नोटा विमाकृत केलेल्या स्पीड पोस्टाने रिझर्व बँकेकडे पाठवल्या जाणार आहेत. रिझर्व बँकेने काही महिन्यांपूर्वी २ हजार रुपयांची नोट चलनामधून बाद केलेली आहे.