आज शुक्रवारी बँक बंद राहणार आहे. शुक्रवारी २७ जून रोजी सर्व सरकारी आणि प्रायव्हेट सेक्टरमधील बँका बंद राहणार आहे. जर तुम्ही आज बँकेत जाऊन कोणते काम करणार असाल तर जाऊ नका. देशातील दोन राज्यांमध्येच बँका बंद राहणार आहेत. इतर राज्यांमधील बँका सुरु असणार आहे.
या दोन राज्यातील बँका बंद
शुक्रवारी ओडिशा आणि मणिपूरमधील बँका बंद राहणार आहेत. रथयात्रानिमित्त या बँका बंद राहणार आहेत. हा सण ओडिशामधील पुरीमधील भगवान जगन्नाथ यांची रथ यात्रा म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लाखो भाविक या यात्रेनिमित्त जमतात. मणिपुरमध्ये याला कांग या नावाने ओळखले जाते. हा एक सण आहे. या दिवशी दोन्ही राज्यांमध्ये सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे आज या दोन्ही राज्यातील पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमधील बँका बंद राहणार आहेत. जर तुम्ही ओडिशा आणि मणिपुरमध्येराहत असाल तर आज बँकेत जाऊ नका. आज बँका बंद असणार आहेत.
बँकांच्या सुट्ट्यांची लिस्ट
२७ जून (शुक्रवार)- रथ यात्रा/कांगनिमित्त ओडिशा आणि मणिपुरमधील बँका बंद
३० जून (सोमवार)- मिझोराममधील बँका बंद
२८ जून (चौथा शनिवार)
२९ जून (रविवार)
डिजिटल बँकिंग सेवा सुरु
जरी बँकांना सलग सुट्ट्या असल्या तरीही डिजिटल बँकिंग सेवा सुरु राहणार आहे. मोबाईल अॅप, वॉलेट आणि एटीएम सेवा सुरु राहणार आहे. त्यामुळे तुम्ही ऑनलाइन, यूपीआयद्वारे ट्रान्झॅक्शन करु शकणार आहेत.