आत्ताच एक मोठी बातमी समोर अली आहे. भारतीय रिझर्व्ह बँके म्हणजेच आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ॲसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर असून चिंता करण्याचे काहीच कारण नसल्याचे आरबीआयकडून सांगण्यात आले आहे.
ओडिशा येथे जन्म झालेले ६७ वर्षीय शक्तिकांत दास हे आरबीआयचे २५ वे गव्हर्नर आहेत. ६७ वर्षीय शक्तिकांत दास यांना ॲसिडिटीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तपासणी करण्यासाठी त्यांना चेन्नई येथील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन ते तीन तासांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
शक्तिकांत दास यांची प्रकृती ठीक असून त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काळजी करण्यासारखे काहीही कारण नाही. आरबीआय गव्हर्नरच्या प्रकृतीबाबत माहिती देताना रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले की, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती नाही आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.