पीएम मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च, खरेदी करण्यासाठी मोजावे लागतील
पीएम मोदींच्या हस्ते 90 रुपयांचे नाणे लॉन्च, खरेदी करण्यासाठी मोजावे लागतील "इतके" रुपये
img
Dipali Ghadwaje
भारतातील सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणारी देशातील मध्यवर्ती आणि सर्वात मोठी बँक, भारतीय रिझर्व्ह बँकेचा आज 90 वा वर्धापन दिन आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 90 रुपयांचे नाणेही प्रसिद्ध केले.

भारतीय रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने 3.5 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली. RBI च्या 90 वर्षांच्या कार्याबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाची बँकिंग व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी RBI ची भूमिका खूप महत्वाची आहे.

आरबीआय जे काही काम करते त्याचा थेट परिणाम देशातील सामान्य लोकांच्या अर्थव्यवस्थेवर होतो. शेवटच्या टप्प्यावर उभ्या असलेल्या लोकांपर्यंत आर्थिक फायदे पोहोचवण्यात आरबीआयने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

रिझर्व्ह बँकेला 90 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदींनी 90 रुपयांचे स्मरणार्थी नाणे जारी केले. देशात प्रथमच 90 रुपयांचे नाणे जारी करण्यात आले आहे. या नाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ते शुद्ध चांदीचे आहे. याशिवाय यामध्ये 40 ग्रॅम चांदीचा वापर करण्यात आला आहे. 90 रुपयांच्या चांदीच्या नाण्यावर एका बाजूला बँकेचा लोगो आहे आणि दुसऱ्या बाजूला 90 रुपये असे लिहिलेले आहे.

तसेच, त्याच्या उजव्या बाजूला हिंदीमध्ये आणि डाव्या बाजूला इंग्रजीमध्ये भारत लिहिले आहे. त्याच्या एका बाजूला आरबीआयचा लोगो आहे आणि नाण्याच्या वरच्या बाजूला हिंदीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि खालच्या बाजूला इंग्रजीमध्ये लिहिलेले असेल. लोगोच्या खाली RBI @90 असे लिहिलेले आहे. 19 मार्च 2024 रोजी, आर्थिक व्यवहार विभाग, वित्त मंत्रालय, भारत सरकार यांनी हे नाणे जारी करण्यासाठी राजपत्र अधिसूचना देखील जारी केली होती.

नाण्याची किती किमत आहे?
भारत सरकारने बनवलेल्या या 90 रुपयांच्या नाण्याचे वजन 40 ग्रॅम आहे जे 99.9 टक्के शुद्ध चांदीपासून बनलेले आहे. 90 रुपयांचे हे नाणे लाँच केल्यानंतर दर्शनी मूल्यापेक्षा अधिक किमतीवर विकले जाईल. या नाण्याची अंदाजे किमत 5,200 ते 5,500 रुपये असण्याची शक्यता आहे.  

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group