कमॉडिटी बाजारात सुरू असलेली घसरण कायम असून सोन्याच्या आणि चांदीच्या दरातही मोठा फरक पडला आहे. सोन्याच्या किंमती आणखी खाली घसरल्या आहेत. सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. आज सोनं-चांदी खरेदी करण्याचा जर तुम्ही प्लान करत असाल तर आजचे १८, २२ आणि २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर आणि चांदीचे दर किती आहेत ते जाणून घ्या...
आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात सर्वात मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरात ९,०५० रुपयांनी घसरण झाली आहे. २४ कॅरेटचे एक तोळा सोनं खरेदीसाठी आज १,५१,५३० रुपये खर्च करावे लागणार आहेत. तर २४ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरात तब्बल ९०,५०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज १५,१५,३०० रुपये खर्च करावे लागणार आहे.
आज २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये ८,३०० रुपयांनी घसरण झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज १,३८,९०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर २२ कॅरेटचे १० तोळा सोनं ८३,००० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज १३,८९,००० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
२४ आणि २२ कॅरेटच्या सोन्यापाठोपाठ आज १८ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी घसरण झाली. आज १८ कॅरेटचे १ तोळा सोनं ६,७९० रुपयांनी स्वस्त झालं आहे. हे सोनं खरेदीसाठी आज तुम्हाला १,१३,६५० रुपये खर्च करावे लागतील. तर आज १८ कॅरेटच्या १० तोळा सोन्याच्या दरामध्ये ६७,९०० रुपयांनी घसरण झाली. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज ११,३६,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत.
दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १ ग्रॅम चांदीच्या दरात ५० रुपयांनी घसरण झाली आहे. १ ग्रॅम चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३०० रुपये खर्च करावे लागणार आहे. तर १ किलो चांदीचे दर तब्बल ५०,००० रुपयांनी स्वस्त झाले आहे. ही चांदी खरेदीसाठी आज तुम्हाला ३,००,००० रुपये खर्च करावे लागणार आहे. त्यामुळे आज सोन्यासोबत चांदी खरेदी करण्याची चांगली संधी आहे.