गौरी आगमनाला सोने खरेदीची संधी !  सोन्याच्या दरात प्रतितोळा सर्वात मोठी घसरण
गौरी आगमनाला सोने खरेदीची संधी ! सोन्याच्या दरात प्रतितोळा सर्वात मोठी घसरण
img
Nandini khandare More

गौरी आगमनाच्या दिवशी सोने खरीददारांसाठी मोठी संधी आहे. कारण अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात होणाऱ्या चढ उतारानंतर आज  सोन्याच्या दरात प्रतितोळा सर्वात मोठी घसरण झाल्याचे वृत्त आहे. 

भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. २२, २४ आणि १८ कॅरेटच्या सोन्याचे भाव स्वस्त झाले आहेत. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति तोळा ६०० रुपयांनी घसरण नोंदवण्यात आली आहे. चांदीच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत ही घट झाली आहे. त्यामुळे सण आणि लग्नसराईच्या काळात दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे.

आजच्या ताज्या दरानुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव १ ग्रामसाठी १५,२९९ रुपये झाला असून त्यात ६० रुपयांची घसरण झाली आहे. तर १० ग्राम २४ कॅरेट सोन्याचा दर ६०० रुपयांनी कमी होऊन १,५२,९९० रुपये इतका झाला आहे. तसेच सर्वाधिक मागणी असलेल्या २२ कॅरेट सोन्याचा विचार केला असता, १ ग्राम सोन्याचा दर ५५ रुपयांनी घसरून १४,०२५ रुपये झाला आहे, तर १० ग्राम २२ कॅरेटसाठी ग्राहकांना १,४०,२५० रुपये मोजावे लागत आहेत. यात १० ग्राममागे ५५० रुपयांची कपात झाली आहे.

दुसरीकडे, १८ कॅरेट सोन्याच्या दरातही आज घसरण नोंदवली गेली आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा १ ग्रामचा भाव ११,४८३ रुपये असून त्यात ४० रुपयांची घट झाली आहे. तर १० ग्राम १८ कॅरेट सोन्याचा भाव ४०० रुपयांनी कमी होऊन १,१४,८३० रुपयांवर आला आहे. १०० ग्राम सोन्याचा विचार केल्यास २४ कॅरेटमध्ये थेट ६,००० रुपयांची, २२ कॅरेटमध्ये ५,५०० रुपयांची आणि १८ कॅरेटमध्ये ४,००० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. यामुळे आज सोन्याच्या बाजारात ग्राहकांची पावले वळण्याची शक्यता आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group